पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे; वायगाव बैलमारे येथील धक्कादायक प्रकार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे; वायगाव बैलमारे येथील धक्कादायक प्रकार

LOKSANDESH  NEWS 




 पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे; वायगाव बैलमारे येथील धक्कादायक प्रकार


 वायगाव बैलमारे गावात पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समुद्रपूर तालुक्यातील वायगाव बैलमारे या गावात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीतून संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्या जातो, परंतु मागील 2 वर्षांपासून सदर टाकीतून ग्रामपंचायत कडून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे,तसेच अनेक वेळा पिण्याच्या पाण्याच्या नळातून विविध प्राण्यांच्या मासांचे तुकडे येत असल्याचेही धक्कादायक माहिती ग्रामस्थांकडून समोर आली आहे.

अनेक वेळा गावकऱ्यांनी ग्रामपंचायत, तहसीलदार, बीडीओ यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले, ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्याच्या टाकीची योग्य देखभाल करण्यात येत नाही, साफसफाई तसेच जंतुनाशक सुद्धा टाकल्या जात नाही, जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या निधीचा योग्य वापर ग्रामपंचायत कडून करण्यात येत नसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या दूषित पाण्यामुळे गावात हैजा, गॅस्ट्रो, हगवण, पोटदुखी, उलटी सारख्या जीवघेण्या रोगामुळे गावकरी त्रस्त आहेत.

 यामुळे गावातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला धोका असून शासनाने तात्काळ उपयोजना करावी व या विषयावर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी घेऊन वायगाव बैलमारे गावातील ग्रामस्थांनी आज दिणांक 16 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास दूषित पिण्याचे पाणी व पाण्यात आलेले मासांचे तुकडे घेऊन जिल्हा परिषदेवर धडक दिली व जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन दिले आहे.आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली