अनधिकृत इमारतीवर पोलीस बंदोबस्त मिळताच कारवाई होणार, केडीएमसीचे स्पष्टीकरण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अनधिकृत इमारतीवर पोलीस बंदोबस्त मिळताच कारवाई होणार, केडीएमसीचे स्पष्टीकरण

                                                           LOKSANDESH  NEWS 



अनधिकृत इमारतीवर पोलीस बंदोबस्त मिळताच कारवाई होणार, केडीएमसीचे स्पष्टीकरण 



 कल्याण पूर्वेतील सागरनगर परिसरात दोन बहुमजली इमारत अनधिकृतपणे उभी करण्यात आली. या इमारतीसंदर्भात वारंवार तक्रार करुन देखील केडीएमसी या इमारती पाडत नसल्याचा आरोप तक्रारदार अंकुश दुबे यांनी केली आहे. एखादा गरीब व्यक्ती घर बांधतो, चाळ तयार होते. 

त्या विरोधात महापालिका प्रशासन कारवाई करते. माझ्याकडून तक्रारी करुन देखील महापालिका कारवाई का करीत नाही, असा सवाल दुबे यांनी उपस्थित केला आहे. या बाबत केडीएमसीचे अधिकारी उमेश यमगर यांनी सांगितेल की, आमच्याकडून संबंधित इमारतीचे पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त मिळताच पुढील कारवाई केली जाईल.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली