LOKSANDESH NEWS
निफाड तालुक्यातील वेळापूर येथील गव्हाच्या शेतात वीजेच्या तारा आणि पोल पडल्याने गहू जळून खाक
निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील वेळापूर येथील निलेश हिरामण पालवे या शेतकऱ्याच्या काढणीला आलेल्या अंकुर केदार या चांगल्या दर्जाच्या गव्हामध्ये अचानक वीज वितरण कंपनीचे पोल आणि तारा पडल्यामुळे जवळपास अडीच एकर गहू पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
70 ते 80 हजार रुपये खर्च करत 60 क्विंटल गव्हाचे उत्पादन येणार होते यात शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली