LOKSANDESH NEWS
'वगदी' ला लहान मुले लटकावण्याची शेकडो वर्षांची परंपरा, रेणुका देवीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण वगदी
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका देवी यात्रा सुरू असून सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यात्रेचे सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे वगदी असून सकाळ पासून परिसरातील पाच ठिकाणावरून ही वगदी निघाली असून या वगदीला लहान मुलांना लटकावण्याची परंपरा आजही कायम आहे.
शेलुद येथील देवीच्या वगदीला पाहिले मानाचे स्थान असून जोपर्यंत ही वगदी निघत नाही तोपर्यात कोणतीही वगदी प्रदक्षिणा साठी निघत नाही.
रेणुका देवीच्या मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्यावर या वगदी आपल्या ठिकाणावर परत जाऊन समारोप घेतात. यासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी असते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली