LOKSANDESH NEWS
माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेऊ नका, राजू शेट्टी यांची मागणी
माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेऊ नका अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते जालन्यातील वडीगोद्री येथे पत्रकारांशी बोलत होते.
आज जगभरात कांद्याला मागणी आहे. कांद्याचे आयातशुल्क दोन महिन्यांपूर्वी शून्यावर आणलं असतं तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे शिल्लक मिळाले असते, अशी टीका शेट्टी यांनी कांद्याबाबत कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरून केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली