इस्लामपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ईव्हीएम सरकार विरोधात एल्गार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

इस्लामपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ईव्हीएम सरकार विरोधात एल्गार

LOKSANDESH NEWS 



                इस्लामपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ईव्हीएम सरकार विरोधात एल्गार

 आज बुधवार दिनांक 09/04/2025 रोजी इस्लामपूर तहसील परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख शकिल सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शनं करण्यात आली. ईव्हीएम सरकार चा धिक्कार असो, शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कृषिमंत्री माणिक कोकाट्याचा धिक्कार असो, लाडक्या बहिणीचा अवमान करणाऱ्या मस्तवाल भाजप सरकारचा धिक्कार असो, गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला. यावेळी  शकिल सय्यद बोलताना म्हणाले ईव्हीएम सरकार स्थापन होऊन जवळपास 100 दिवस उलटले आहेत, परंतु या सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला जी आश्वासने दिली होती ती पुर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. हे म्हणले महागाई कमी करु आज महागाई चा म सुद्धा बोलायला तयार नाहीत महागाई गगनाला भिडली आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत, गॅस चे पेट्रोल डिझेल चे दर कमी होणे गरजेचे असताना या नालायक सरकार ने घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग करून लाडक्या बहिणीला भेट देऊन तिचा अवमान च केला आहे.

पेट्रोल,डीझेल चे दर ही भडकणार आहेत. विज पुरवठा भरपुर आहे म्हणत विजेचे दर 60 पैसे युनिटला वाढवून गोरगरीब जनतेला महागाईत होरपळण्याच पाप सरकार करतंय. या सरकारचे मंत्री बेताल वक्तव्य करतायत शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कृषिमंत्री माणिक कोकाट्याचा निषेध करत सय्यद म्हणाले आज या ईव्हीएम सरकार न जवळपास 25 लाख  शेतकऱ्यांना सहकारी संस्था व बँकेकडून कलम 101 ची नोटीस बजावून शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळुन आत्महत्येस प्रव्रुत करण्याचं पापं करतंय. मुस्लिम वक्फ बोर्डाचे बिल पास करुण मुस्लिम वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा नाही तर त्या जमिनी कवडीमोल भावाने मित्राच्या म्हणजे अदानी, रामदेव बाबा यांच्या घशात घालण्याचा पाप सुद्धा हेच ईव्हीएम सरकार न केले आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात दरी, द्वेष पसरविण्याचे पाप हे नालायक सरकार करत आहे. कर्जमाफी तर दिलीच नाही उलट 25 लाख शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या. म्हणजे 25 लाख कुटुंबांचा विचार केला तर आज दीड कोटी जनतेच्या गळ्याला फास आवळला जात आहे. हे सरकार ब्रह्मदेव ही पाच वर्षे काय करु शकत नाही या आविर्भावात आहे. ब्रह्मदेव याचं काय करो न करो परंतु जनतेने बळीराजाने आता रस्त्यावर वर उतरुन भाजप महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून हद्दपार करण्यासाठी जातीपातीचे राजकारण सोडून वज्रमूठ आवळुन ईव्हीएम सरकार विरोधात एल्गार पुकारला पाहिजे. 

हीच वेळ आहे आता जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा असा जोरदार आव्हान यावेळी सय्यद यांनी केले. बळीराजा जागा हो आता नाही तर परत नाही. कोणी बंड पकडायचे कोणी वाईटपणा घ्यायचा हे पाहण्याची वेळ नाही. आपल्या वाळवा तालुक्याला क्रांती सिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित वाळवा तालुका आहे. जातधर्मपालीकडे जाऊन वज्रमुठ आवळू, आणि गो बॅक भाजप चां लढा उभा करुण संपुर्ण महाराष्ट्र व देशात ईव्हीएम सरकार विरोधात एल्गार पुकारू. असं आवाहन करताच  शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी प्रमुख उपस्थितीत तात्यासाहेब बामणे अशोक चव्हाण रामराव थोरात जमीर नालबंद रशिद डाके दिपक कळसे अरुण कुपाडे इकबाल वायकर सुरेल अन्सारी,सिकंदर शेख नितीन धुमाळे  भाऊ माने विकास पिसाळ आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली