LOKSANDESH NEWS
खालापूरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा
खालापूर तालुक्यात सकल हिंदू समाज खालापूर यांच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात पनवेल आमदार प्रशांत ठाकूर हे देखील सहभागी झाले होते.
सदरचा मोर्चा हा हिंदू समाजाच्या अस्मितेसाठी, गोमातेच्या रक्षणासाठी, अवैध कत्तलखाणे उध्वस्त करण्यासाठी, दोषींवर कठोर कारवाई साठी तसेच अनेक अवैध गटविधीवर कारवाई करण्यात यावी, सुरक्षित गोवंशसाठी आणि गोरक्षक आणि पोलिसांच्या सुरक्षेसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरचा हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत खालापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली