Loksandesh news
बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुरामाची मूर्तीच जल्लोषात चोपड्यात स्वागत
जळगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने चोपडा येथील बहुभाषिक परशुराम जन्मोत्सव समिती बहुभाषिक ब्राह्मण समाज या मंडळाला परशुरामाची मूर्ती देण्यात आली त्या मूर्तीच चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी भगवान परशुरामांचे मूर्तीचे पूजा राजू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने चोपडा येथील बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे पुरुष व महिला उपस्थित होत्या. आगमन व स्वागत सोहळा संपन्न झाल्यानंतर भगवान परशुरामाची मूर्तीचे प्रस्थान गांधी चौक येथील रोकड बालाजी मंदिर येथे नेण्यात येणार असल्याचे परशुराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली