LOKSANDESH NEWS
नांदेडच्या मालटेकडी भागात फर्निचरच्या काका कुशन गोडाऊनला आग
नांदेड शहरातील मालटेकडी भागात अचानकपणे काका कुशन फर्निचरच्या गोडाऊनला आग लागण्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, वेळीच अग्निशमन दलाची गाडी तिथे पोहोचल्याने ही आग इतरत्र पोहोचली नाही.
अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून ही आग विझवली आहे. आहे या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली