LOKSANDESH NEWS
महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी रोजगार काही वर्षांपासून सतत विविध आंदोलन करीत आहे. परंतु सरकार बदलत गेली आणि लोकप्रतिनिधींची पगारे आणि निवृत्ति पेंशनमध्ये सुद्धा वाढ झाली.
मात्र, ग्रामीण भागात अत्यंत कमी वेतन घेऊन काम करणारा ग्राम रोजगार सेवक मात्र अजूनही पगारवाढीपासून वंचित आहे. म्हणून ग्राम रोजगार सेवक संघटनेने आंदोलनाची भूमिका घेत सरकारला 3 ऑक्टोंबर 2024 शासन निर्णय अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्यात आले.