२०२९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका होऊन, आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणार - चंद्रकांत खैरे
२०२९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका होतील, आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. असे भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवल आहे. जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असतांना, खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी २०२९ साली भाजपचे अंधपतन होऊन, शिवसेना सत्तेत येणार असल्याचा दावा केला. रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला.
असा आरोप खैरे यांनी केला. आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत दानवेंना देवाने जालन्यात पराभूत केले. असा टोला खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणार, असा ईशारा देखील खैरे यांनी भाजपला दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली