सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय
- आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या श्री. सिद्धेश्वर विकास पॅनलचा १८ पैकी १५ जागांवर विजय
- तर भाजप आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका
- १८ पैकी केवळ ३ जागांवर सुभाष देशमुख यांच्या श्री. सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय
- निर्णायक असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील ११ पैकी ११ जागांवर कल्याणशेट्टी पॅनलचे एकहाती वर्चस्व
- तर ग्रामपंचायतीतील ४ पैकी ३ जागांवर सुभाष देशमुखांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केले
- सोलापूर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याने, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना फायदा
माजी आमदार दिलीप माने ON बाजार समिती निवडणूक :-
- मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्हीही निवडणूक लढवलेली आहे
- आमचे पॅनल प्रमुख आ. सचिन कल्याणशेट्टी यांना सोबत घेऊन, आम्ही निवडणूक लढवली. आम्हाला जवळजवळ ७५ टक्के मते मिळाली आहेत.
- ग्रामपंचायत पदांमध्ये आम्ही कुठे चुकलो, याचा निरीक्षण आम्हाला करावा लागेल, ते तीन सीट जरी निवडून आले असतील तरी मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एकोप्याने करू
- शेतकरी हितासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, आमच्या विजयाचा त्यांच्यासाठी नक्की फायदा करू
- सभापती पदाबाबत आम्ही अजून काही ठरवलेले नाही. आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आम्ही एकत्र मिळून ठरवू.
- आणि आमच्यात काही झालं तर मुख्यमंत्री जे ठरवतील तसे करू
आमदार सचिन कल्याणशेट्टी ON बाजार समिती निवडणूक :-
- त्यांना मिळाल्याच्या तीन पट मते आम्हाला मिळाली आहे
- शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं
- १५ सीट आमचे निवडून दिले. ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे त्यांचे धन्यवाद
- ग्रामपंचायत कुठे आम्ही कमी पडलो, याबाबतीत आम्हाला विचार करावा लागेल
- आम्हाला १८ चे १८ सीट अपेक्षित होते. पण आम्ही कुठे कमी पडलो. दुर्दैवाने आमचे तीन सीट गेले यावरही विचार करू
- सभापती पदासाठी कोणतीही चुरस नाही. आमचं सगल ठरला आहे, मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू
- निकाल झाल्यानंतर आजही आम्ही एक आहोत. मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू
- आ. सुभाष देशमुख यांचे तीन उमेदवार निवडून आले त्यासाठी त्यांचे मी अभिनंदन करतो
- राजकारणात हार - जीत होत असते.. इथून पुढे बाजार समितीचे काम करताना विरोधात तीन उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन काम करू
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती म्हणून नावारूपास आणू.
- सभापतीसाठी कोणतेही स्पर्धा व कोणतही चुरस नाही
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली