LOKSANDESH NEWS
बोकटे येथील कालभैरवनाथ यात्रेला सुरुवात
येवला तालुक्यातील बोकटे गावातील सर्वात मोठी यात्रा म्हणून याची ख्याती असून येथे श्री काल भैरवनाथाची यात्रा 8 दिवस चालते.
याच यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला या ठिकाणी दर्शनासाठी आणल्यानंतर निवारण होते अशी भावना आहे.
यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले मानकरी जाधव घराण्याचे वंशज श्री माधवरायाची घोड्यावर बसून यात्रेच्या पहिल्या दिवशी भव्य मिरवणुक येण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही आखंडितपणे सुरू आहे.
यात्रेकरता नासिक, नगर, धुळे ,मुंबई ,संभाजीनगर या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातून देखील नागरिक येथे आवर्जून दर्शनासाठी येत असतात. लाखोच्या संख्येने यात्रा उत्सवाला भाविक दर्शनाचा लाभ घेतात.