LOKSANDESH NEWS
गोंदियात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी राहणार बंद
दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असून गोंदिया जिल्ह्याचा पारा हा 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. अशातच गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
12 वाजेनंतर ट्रॅफिक कमी झाल्यास व उष्णता वाढल्यास सिग्नल बंद करण्यात येत आहेत व 4 वाजेच्या दरम्यान ऊन कमी होताच व ट्रॅफिक वाढल्यामुळे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येतात.
यामुळे नागरिकांना भर उन्हात सिग्नल सुरू असल्याने चौकामध्ये थांबावे लागत नाही त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली