काँक्रीट रस्त्याचे काम आणि गॅस पाईपलाइन कामामुळे डोंबिवलीकर हैराण; काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अधिकाऱ्यांचे आश्वासन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काँक्रीट रस्त्याचे काम आणि गॅस पाईपलाइन कामामुळे डोंबिवलीकर हैराण; काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अधिकाऱ्यांचे आश्वासन

                                                        LOKSANDESH  NEWS 



काँक्रीट रस्त्याचे काम आणि गॅस पाईपलाइन कामामुळे डोंबिवलीकर हैराण; काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अधिकाऱ्यांचे आश्वासन



 डोंबिवली शहरात सध्या काँक्रीट रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या कामांमुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो आहे.

 त्यातच महानगर गॅस कंपनीने देखील गॅस पाईपलाइन टाकण्याची कामे सुरू केली आहेत. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यावर मातीने भरलेले खड्डे तसेच ठेवले गेले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना चालणे देखील अवघड झाले असून, डोंबिवलीकर अक्षरश: हैराण झाले आहेत. तर या बाबत पालिका अधिकारी जिओ आणि महानगर गॅसच्या कामाला मोठ्या प्रमाणात परवानगी दिली असून ते खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेचे असल्याने कुठेही अशा प्रकारे राहिले तर पालिकेकडून ते खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात येतील असे आश्वासन देत आहे. सध्या डोंबिवलीकरांचा संयम सुटू लागला असून, प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

       डोंबिवली शहरातील विविध भागांमध्ये सध्या एकाच वेळी काँक्रीट रस्त्यांचे आणि गॅस पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. परिणामी रस्ते खोदले गेले असून वाहतूक कोंडी ही एक समस्या बनत चालली आहे. अनेक भागांमध्ये खड्डे, मातीचे ढिगारे आणि अपूर्ण रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. 

गॅस पाईपलाइन टाकून झालेल्या रस्त्यांवर केवळ माती टाकून काम उरकले गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी चालताना पाय घसरून पडण्याची शक्यता वाढली आहे. दुचाकीस्वार आणि वयोवृद्ध नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा जवळ येत असल्याने या खड्ड्यांमध्ये चिखल आणि पाणी साचून अपघाताची शक्यता आहे. पालिकेकडून खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात येतील असे आश्वासन देण्यात येत आहेत.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली