हॉर्न वाजवल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी; बाप-लेक गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

हॉर्न वाजवल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी; बाप-लेक गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

                                                              LOKSANDESH  NEWS 

हॉर्न वाजवल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी; बाप-लेक गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद


 भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरातील सिटी टॉवर हाऊसिंग सोसायटीत किरकोळ कारणावरून मोठा वाद उफाळून आला. बाईकचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत तनवीर फारुकी आणि त्यांचा मुलगा अदीन फारुकी हे बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 शहबाज अन्सारी (पहिला मजला) आणि तनवीर फारुकी (दुसरा मजला) या शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये आधी मुलांच्या वादातून सुरुवात झाली. मात्र, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. शहबाज अन्सारी, त्यांचा मुलगा आणि अन्य साथीदारांनी मिळून तनवीर फारुकी व अदीन फारुकी यांच्यावर जबर हल्ला केला.

दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने प्रथम भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. निजामपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली