यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. वन्य प्राण्यांसाठी जंगलात पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे असले तरी त्यात पाणी नाही. यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत आहे. यामुळे वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होत चालला आहे. शिकारीही शिकारीच्या प्रयत्नात आहे. याकडे वनविभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.
एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत आहे. विहीर आणि धरणातील जलसाठा कमी झाला आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिला आणि पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी काही ठिकाणी विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातून वन्य प्राणी देखील सुटू शकले नाही. वनविभागाचे वन्य प्राण्यांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन कागदोपत्री आहे.त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. रोही, रान डुक्कर, निल गाय, मोर, बिबट आदी वन्य प्राणी रस्त्याने सहज नागरिकांना दिसत आहे. त्यांच्याकडून हल्ला ही केला जात आहे. वन विभागाने गांभीर्याने आताच नियोजन न केल्यास मे महिन्यात पाणी टंचाई गंभीर रूप धारण करेल अशी चिन्हे आहे.
उन्हाळ्यात वन्य जीवांना पाण्यासाठी आपले अधिवास सोडून मानवी वस्तीकडे यावे लागत आहे. जंगलात पाणवठे असले तरी त्यात पाणी नाही. वन्य जीव गावात येत असल्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने पाण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून वन्य जीव गावाकडे येणार नाही.
जंगलात पाणवठे असले तरी त्यात पाणी नाही. त्यामुळे वन्य जीव गावात येत असल्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेतीचे नुकसान केले जात आहे. वन विभागाने पाण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून वन्य जीव गावाकडे येणार नाही.
सूर्य आग ओकत आहे. जंगलात पाणी नाही. वन्य जीव मानवी वस्तीत येत असल्यामुळे संघर्ष होण्याची भीती आहे. वन्य जीव पिकात शिरून नासाडी करीत असल्यामुळे नुकसान होत आहे. पाण्यासाठी वन्य जिवाची भटकंती थांबवण्यासाठी वनविभागाने गंभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.