समाजातल्या कोणत्याच घटकाला न्याय देऊ शकत नसाल तर राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे - जयश्री शेळके

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

समाजातल्या कोणत्याच घटकाला न्याय देऊ शकत नसाल तर राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे - जयश्री शेळके

                                                        LOKSANDESH  NEWS 

समाजातल्या कोणत्याच घटकाला न्याय देऊ शकत नसाल तर राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे - जयश्री शेळके

 विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मोठ मोठ्या योजनांचा बोभाटा करून जनतेची मते मिळणाऱ्या महायुती सरकारला निवडणुकीनंतर मात्र समाजातल्या सगळ्याचं घटकांचा विसर पडलेला आहे. आधी लाडक्या बहिणींना सांगितले आम्ही 2100 रु. देऊ शकत नाही.

नंतर शेतकरी बांधवांना सांगितले आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. आता तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय मारण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार मिळालेला आहे तोही आता आणि तो सुद्धा 56 टक्के. 44 टक्के पगारामध्ये कपात करण्यात आलेली आहे. 

हे 44 टक्के कधी मिळतील हेही सांगितलेलं नाही. अशा प्रकारे जर समाजातल्या कोणत्याच घटकाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर या राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत.

 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली