कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून रथयात्रेचा शुभारंभ
१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यंदा १ मे महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यावतीने १ ते ४ मे २०२५ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणांची माती आणि पाणी एकत्रित करत महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढली जात आहे. या रथयात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून करण्यात आली.
यावेळी कोल्हापुरातील धरणांसह जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र पाणी आणि गडकिल्ल्यांवरील माती एका रथावर ठेवलेल्या कलशांमध्ये एकत्रित करण्यात आली. पुढे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमधून माती आणि पाणी संकलित करत हा रथ फिरणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली