LOKSANDESH NEWS
पहलगाम येथील हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर कुठलाही परिणाम नाही, भाविकांकडून धुळ्यात रजिस्ट्रेशन सुरळीत सुरू
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम सर्वत्र झाल्याचे पाहायला मिळत असून पुढील महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन विविध बँकांमध्ये सुरू झाले असून या रजिस्ट्रेशन साठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान या दहशतवादी हल्ल्याचा कुठलाही परिणाम गेल्या तीन दिवसांपासून रजिस्ट्रेशन वर झालेला नसून जवळपास 300 हून अधिक भाविकांचे रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.विशेष म्हणजे पहलगाम मार्गे अमरनाथ यात्रा करणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली