सरकारचे आरोग्य विभागांच्या परिपत्रकानुसार आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन फेस रीडिंग व बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या माध्यमातून अदा करण्यात यावे, या निर्णयाविरोधात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी विविध संघटनेच्या माध्यमातून एकवटले आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे 24 बाय 7 सेवा देत असतात. त्यांना इतर विभागाप्रमाणे आठ तास ड्युटी नसल्याने, 24 बाय ७ त्यांना काम करावे लागते. इमर्जन्सी डिलिव्हरी तसेच साथ आले असता आरोग्य अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी सेवा पुरवित असतो. तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती नसल्याने, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देखील देण्यात आले.
अधिकारी व कर्मचारी गावात जाऊन सेवा देणे हे देखील काम करीत असत. या फेस रीडिंग व बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमुळे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावर त्याचा परिणाम होणार आहे. शासनाने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची कामाची वेळ निश्चित करून द्यावी, फेस रीडिंग व बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कर्मचाऱ्यांवर लादु नये. या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी विविध संघटनेच्या माध्यमातून तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे सुचित केले आहे. शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी हे संपाचे हत्यार उचलणार असल्याचे यावेळी सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली