LOKSANDESH NEWS
धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र, या गोंदिया जिल्ह्यामध्ये आता पारंपारिक पिकांना बगल देत काही शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील भागी येथील एका शिक्षक शेतकऱ्यांनी आपल्या साडेतीन एकरच्या शेतीमध्ये पेरू आणि आंब्याची बाग लावलेली आहे आणि यामधून त्याला वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपये उत्पादन होत आहे.
तर पारंपरिक पिकांमध्ये उत्पन्न होत नव्हते म्हणून पेरूची व आंब्याची शेती केली असल्याचे शिक्षक शेतकऱ्यांना सांगितले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपारिक पिकांपेक्षा नगदी पिकांकडे वळायला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली