LOKSANDESH NEWS
येवल्यात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा
महावीर जयंती निमित्त येवला शहरात जैन समाजाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेला जैन मंदिरापासून सुरुवात करण्यात आली होती.
या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते. दिवसभर महावीर जयंती निमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली