गोंदिया जिल्ह्यातील तापमान लगतच्या जिल्ह्यांपेक्षा कमी, पुढील आठवड्यात तापमान मध्ये वाढ होण्याची शक्यता
गोंदिया जिल्ह्यात सध्या तापमानात हवी त्या प्रकारे वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्याचे तापमान हे सामान्य दाखवले आहे. मात्र गोंदियाच्या बाजूला असलेल्या चंद्रपूर ,गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केला आहे.
आणि या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आणि या ठिकाणातून वाहणारे 30 ते 40 प्रति तास वेगाने वारे हे गोंदिया जिल्ह्यापर्यंत येत असल्याने त्याचा प्रभाव हा होत असल्याने जिल्ह्याच्या तापमानात कमी प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
इतर जिल्ह्यांच्या प्रभावा गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून आला आहे. असे वातावरण काही दिवस राहू शकतो मात्र त्यानंतर जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले.