पितांबरीच्या डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न
पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांना नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्यावतीने डि.लिट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. या निमित्त विविध संस्था आणि हितचिंतकाच्या नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा जाहीर नागरी सत्कार आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, अध्यात्माचे उपासक, सुप्रसिद्ध व्याख्याते, डॉ. सच्चिदानंद शेवडे, चितळे उद्योग समुहाचे श्रीकृष्ण चितळे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. या सत्कारप्रसंगी मानपत्राचे वाचन अरुंधती भालेराव यांनी केले. तर डॉ. प्रभुदेसाई यांच्यावरील स्मरणिकेचे प्रकाशन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.