LOKSANDESH NEWS
नांदेडच्या गारगोटवाडीत भीषण पाणीटंचाई
नांदेड जिल्ह्यात अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने तासंतास लोकांना पाणी भरण्यासाठी बोअरवेलवर वाट बघावी लागते. दिवसभर आम्हाला पाणी भरण्याचं काम कराव लागत आहे.
अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली, तर गावात पाणी नसल्याने, मुलांची लग्न होत नाहीत. असही महिला म्हणाल्या आहेत. गावात अनेक लग्न न झालेली मुलं आहेत, मात्र गावात पाणी असल्याने कोणी मुलगी देत नाही. खासदार अशोकराव चव्हाण यांनी लक्ष देऊन गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली