नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका म्हटलं की दरवर्षी पाणीटंचाई सुरुच असते, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत खडक ओझर व गुऱ्हाळे यांच्याकडून स्व- निधीमधून पाणी टँकर उपलब्ध केला आहे. त्या टँकरचा ना नफा न तोटा या तत्त्वावर लोकांच्या सेवेसाठी पाणी टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे. चांदवड तालुक्यातील विहीर बोरवेल यांनी तळ गाठला असून आजुबाजुची धरणे व तलावे संपूर्ण ओसाड पडली आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच सागर पगार यांनी सर्व गावातील नागरिकांची एक बैठक घेऊन या बैठकीत आपल्याला मार्च एप्रिल मे या महिन्यात पाण्याची अत्यंत गरज असते म्हणून आपण एक टँकर व ऐन वेळेस एखादी व्यक्ती आजारी झाल्यास त्यांना रुग्णवाहिका व वैकुंठ रथ आपल्या ग्रामपंचायत मार्फत ठेवू व तो विनामूल्य देऊ असा निर्णय घेण्यात आला.
तर यावेळी गावातील ग्रामपंचायत जो निर्णय घेते तो गावकऱ्यांच्या सर्वांच्या भल्यासाठीच असतो असे तुकाराम पगार यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायत खडक ओझर व गुऱ्हाळे या ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्राम विस्तार अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी ज्या ज्या गावांना पाण्याची टंचाई भासत असेल त्या त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरावा करणार असे सांगण्यात आले.