.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध रित्या गॅस सिलेंडर वाहतुक व रिफिलींग करणाऱ्या इसमास अटक
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध रित्या गॅस सिलेंडर वाहतुक व रिफिलींग करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
त्या अनुशंगाने सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोना/अनंत कुडाळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, अभिजित लोहार, रा गल्ली नंबर ५. खोतनगर मालगाव रोड, मिरज हा त्याचे राहते घराचे बाहेरील उघड्या पत्र्याचे शेडमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग करून विक्री करत आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे गल्ली नं. ५. खोतनगर मालगाव रोड, मिरज येथील अभिजित लोहार याचे घराजवळ जावून पाहिले असता सदर ठिकाणी घरासमोर एक इसम बसलेला दिसला. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अभिजित विलास लोहार, वय ३१ वर्षे, रा गल्ली नंबर ५. खोतनगर मालगाव रोड, मिरज असे सांगितले. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घरासमोरील पत्र्याचे शेडची झडती घेतली असता सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रीक गॅस मरणेची मोटार व रेग्युलेटर व त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली. त्याचेकडे गॅस रिफिलींग करण्याचा व गॅस सिलेंडर बाळगण्याचा परवान्याबाबत विचारले असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली