LOKSANDESH NEWS
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
लक्ष्मी चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून सुरू झालेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला.
तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि छत्रपती संभाजीनगरच्या हर्षा ठाकूर यांचे भाषण झाले. जात-पात विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली