LOKSANDESH NEWS
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड तपासणी नाक्यावर बर्निंग कारचा थरार, आगीत संपूर्ण कार जळून खाक
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावर आज पहाटे पहाटे 'द बर्निंग कार' चा थरार अनुभवायला मिळाला आहे. नागपूर वरून झारखंडला जात असताना देवरी तालुक्यातील महाराष्ट्र व छत्तीसगड सीमा तपासणी नाक्यावर अचानक एका चालत्या कारने पेट घेतला.
याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तो पर्यंत आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कार मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली