LOKSANDESH NEWS
मालवण राजकोट येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय. 95% पेक्षा जास्त काम हे पूर्ण झालेलं असून, एक मे महाराष्ट्र दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तलवारधारी पूर्णाकृती पुतळ्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यासह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली