येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार- खा.कल्याण काळे
आज नांदेड जिल्हात काँग्रेस पक्ष निरीक्षक खासदार कल्याण काळे नांदेड दौऱ्यावरती आले असून त्यांनी हदगांव हिमातनगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असतात ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या काँग्रेस स्वबळावर लढणार असून त्या पूर्वतयारीसाठी आम्ही जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेत आहोत व शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे त्यावरती ते म्हणाले की कुठल्याही उद्योगपतीच्या कारखान्यातून रस्ता जात नाही.
मग शेतकऱ्यांच्या का? शेती हे शेतकऱ्यांसाठी पोट भागवण्याचे साधन आहे त्यामुळे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हे शक्तिपीठ महामार्ग होऊ नये यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत व तसेच बीड येथे घडलेल्या घटनेचा काँग्रेसच्या वतीने देखील आम्ही निषेध करत आहोत.