ईडी, सीबीआयच्या गैरवापर करणाऱ्या सरकारचा विरोधात चंद्रपुरात काँग्रेसचे आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ईडी, सीबीआयच्या गैरवापर करणाऱ्या सरकारचा विरोधात चंद्रपुरात काँग्रेसचे आंदोलन

LOKSANDESH  NEWS 




 ईडी, सीबीआयच्या गैरवापर करणाऱ्या सरकारचा विरोधात चंद्रपुरात काँग्रेसचे आंदोलन 



 केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयच्या गैरवापर करून काँग्रेस नेते सोनिया गांधी खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरू आहे. या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमेटी नुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले. 

जवळपास बारा वर्षापासून या प्रकरणात चौकशी सुरू आहे सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने बेल पण दिली आहे तरीसुद्धा हे प्रकरण देशाला दिशाभूल करण्यासाठी आमचे नेते सोनिया गांधी खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडीच्या मार कसा बसेल याच्या प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे परंतु या देशातील काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरणार नाही अजून तीव्र आंदोलन करू असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

हुकूमशाहीवर देश आणि राज्य कशी चालत आहे प्रत्येक महिन्याला आमच्या काँग्रेसच्या नेत्याला नोटीस देऊन ना हा त्रास देत आहे. म्हणून आजच्या हा आंदोलन होत आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला जेलमध्ये टाकायचा असेल तर भाजपातील अनेक भ्रष्टाचार नेते जे खुलेआम सांड्यासारखे फिरत आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही. जे निरअपराध लोक आहे त्यांचे वर चुकीच्या नोटीस देऊन कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. 



 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली