LOKSANDESH NEWS
शिंदी गावात भीषण पाणीटंचाई; महिलांना पाण्यासाठी करावी लागते एक ते दीड किलोमीटर पायपीट
बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, गावातील महिलांना पाण्यासाठी गावाबाहेरील शेतात असलेल्या विहिरीवर एक ते दीड किलोमीटरा पायपीट करत जावे लागत आहे. यामुळे मजुरी सुधा बुडत आहे.
मागील 15 वर्षांपासून तर नळाला सुद्धा पाणी मिळत नसल्याने 300 ते 400 रुपये टँकर प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. गावात कोट्यवधी रुपयांच्या दोन योजना मंजूर झाल्या, त्याचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे आता भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. आम्हाला फक्त पाणी द्या, अशी म्हणण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली