LOKSANDESH NEWS
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक प्रकार, कैचीने भोसकून केली हत्या
- कल्याणच्या एपीएमसी मार्केट मधील धक्कादायक घटना
- भरदिवसा 20 वर्षीय तरुणाने पती, पत्नीसह त्यांच्या मुलावर केला कैचीने हल्ला
- गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी, पत्नीला किरकोळ दुखापत
- चमनलाल कारला असे मयत वडिलांचे नाव, तर मुलगा कार्तिक गंभीर जखमी असून कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
- चिराग सोनी असे या हल्लेखोर तरुणाचे नाव असून, बाजार पेठ पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
- चमनलाल कारला आणि चिराग सोनी हे दोघे एपीएमसी मार्केट मध्ये बाजू बाजूला केळीची पाने विक्री करण्याचा होता व्यवसाय
- आज विक्रीसाठी आलेले केळीच्या पानांचे बंडल अदलाबदली झाल्याने चमनलाल आणि चिराग मध्ये झाला होता वाद
- याच वादातून चिरागने केला कैचीने हल्ला
- आरोपीला अटक
- पोलिसांचा तपास सुरू
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली