प्रकाश बिडवलकर बेपत्ता प्रकरणी पोलीसांनी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रकाश बिडवलकर बेपत्ता प्रकरणी पोलीसांनी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

                                                              LOKSANDESH  NEWS 



               प्रकाश बिडवलकर बेपत्ता प्रकरणी पोलीसांनी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या


   कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा २०२३ पासून बेपत्ता झाल्याची माहिती कुडाळ आणि निवती पोलिसांना प्राप्त झाली. तसेच प्रकाश विरुद्ध कुडाळ न्यायालयात दारुबंदी अधिनयमाखाली दाखल गुन्हयात येत असलेल्या समज बजावणी होत नव्हती. प्रकाश बिडवलकरचा कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शोध सुरु होता. तसेच पोलिसांनी प्रकाश बिडवलकर याच्या घरी जावुन शोध घेण्यात आला. प्रकाश बिडवलकर याच्या घरी त्याची मुकबधीर मावशी राहते. त्यादरम्यान प्रकाश बिडवलकर हा मार्च २०२३ पासून घरी आला नसल्याचे समजुन आले.

प्रकाश बिडवलकर याचे नातेवाईक तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधार सिदधीविनायक ऊर्फ प्रकाश बीडवलकर यास मार्च २०२३ मध्ये पैशाचे कारणावरुन कुडाळ येथील सिदधेश अशांक शिरसाट, अमोल श्रीरंग शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर रा. माणगांव, व सर्व्हेश भास्कर केरकर रा सातार्डा ता सावंतवाडी यांनी त्यास त्याचे राहते घरातुन जबरदस्तीने कारमधुन घेवुन गेल्याचे व त्यापासुन तो बेपत्ता असल्याची माहीती मिळून आली.

वरील प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वेपत्ता सिदधीविनायक ऊर्फ प्रकाश बीडवलकर याचा वरील इसमांनी घातपात केला असल्याचा संशय असल्याने पोलीसांनी आपली तपास चक्रे वेगाने फिरवली. प्रकाश बिडवलकर याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण वय ५० वर्षे रा. चंदवण ता कुडाळ यांचे तक्रारीवरुन दि. ०९.०४.२०२५ रोजी प्रकाश बीडवलकर याचे अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

गुन्हयातील आरोपी १) सिध्देश अशोक शिरसाट, वय- ४४ रा. पानबाजार, ता. कुडाळ २) गणेश कृष्णा नार्वेकर, वय- ३३ रा. माणगांव, ता. कुडाळ ३) सर्वेश भास्कर केरकर वय-२९ रा. सातार्डा, ता. कुडाळ ४) अमोल उर्फ वल्लंभ श्रीरंग शिरसाट रा. पिंगुळी ता. कुडाळ यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करुन ताव्यात घेण्यात आलेले आहे. आरोपीत यांना मा न्यायालयात हजर केले असता त्यांची ०३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा तपास नियती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री सौरभ कुमार अगरवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री कृषिकेश रावले, मा उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी श्री विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस उप निरीक्षक गणेश कन्हाडकर, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, प्रितम कदम, रुपेश सारंग, निवती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, नितिन शेडगे, मारुती कांदळगांवकर, आशिष किनळेकर यांनी केलेली आहे.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली