LOKSANDESH NEWS
बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कुडाळ तालुक्यातील चेंदवण या गावातील सिद्धिविनायक बिडवलकर (वय ३५) या तरुणाचा केवळ हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नग्न करून मारले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. यातील सिद्धेश शिरसाटचे शिंदे गटातील अनेक लोकांशी आहेत. त्याचे बॅनर कालपर्यंत होते.
या प्रकरणी सिद्धेशला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि तेथील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलिसांना फ़ोन केले आहेत. त्यामुळे यांचा खरा “आका” कोण?, या सिद्धेश शिरसाटचा खरा आका कोण? असा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना आहे. खरेतर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत.
या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र आंदोलन करणार असून या परिस्थितीचा “आका” हे पोलिसांनी शोधले पाहिजे, अशी मागणी सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण- खूनप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.