LOKSANDESH NEWS
मुलुंड मधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकाने काढली शिक्षिका व विद्यार्थिनींची छेड, मनसैनिकांनी दिला चोप
मुलुंड मधील मुंबई पब्लिक स्कूल मध्ये एका विकृत शिक्षकाने शाळेतील शिक्षिक यांना रात्री १२ च्या नंतर फोन करून शिवीगाळ करत अश्लील शब्द वापरले व शाळेतील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार देखील केला असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी आज मनसैनिकांनी या शाळेत जाऊन या मॅनेजमेंटला धारेवर धरत शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला व तोंडावर कोळसा फेकून मारला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी या विकृत शिक्षकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली