बनेश्वर रस्त्यासाठी सुप्रिया सुळे यांचे कडाक्याच्या उन्हात बेमुदत धरणे आंदोलन
बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे.
सदर रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मागणी करुन ही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या अनास्थेला कंटाळून अखेर सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलंय.
जोपर्यंत बनेश्वर रस्त्याच्या विषयावर प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार असल्याचे सुळे म्हणाल्या. या देशात करोडो रुपये खर्च करून मेट्रो होते पण दीड किलोमीटरचा रस्ता होत नाही हे दुर्दैव आहे. गेले सहा महीने झाले आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा करतो आहे.
पण हे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.