LOKSANDESH NEWS
कुंभोज येथे आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांचे संचलन
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीत आगामी महावीर जयंती, हनुमान जयंती, शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने कुंभोज येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हातकणंगले पोलीस ठाण्याच्या तर्फे दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले.
तसेच मुख्य बसस्थानक चौक, दिपक चौक, भगवान आदिनाथ चौक , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ,पाण्याची टाकी कुंभोज या मार्गावरुन रूट मार्च काढण्यात आला.
यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, २ पोलीस अधिकारी, १२ अंमलदार, १६ होमगार्ड असा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या वतीने येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात दंगल काबू प्रात्यक्षिक दाखवून पोलीस दल दंगल पार्श्वभूमीवर सक्षम असल्याचा इशारा दिला.कुंभोज येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी संचलन केले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर दंगल काबू प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली