देशातील तापमान दिवसेंदिवस वाढत असताना, मध्य भारतातील तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. विदर्भासोबतच मध्य भारतातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या तीन दिवसांत तापमानात १५ अंशांनी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला नागपूरसह विदर्भात काळे ढग आणि पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून आकाश निरभ्र असल्याने तापमानात १५ अंशांनी वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांपासून नागपुरात तापमानात वाढ होत असल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दुपारी लोकांना उन्हाचा तडाखा जाणवत आहे आणि शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य दिसत आहेत.
नागपूर हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी नागपूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअस होते आणि येत्या काही दिवसांत तापमान ४४ अंशांपर्यंत पोहचेल अशी माहिती हवामान विभागने दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली