गोंदिया आणि भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आहेत आणि या तलावाच्या माध्यमातून गावागावांमध्ये सिंचनाची व्यवस्था केली जाते आणि हे मामा तलाव जिल्ह्याचा एक महत्त्वपूर्ण पाण्याच्या स्त्रोत म्हणून ओळखले जाते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या तलावांचं खोलीकरण झालं नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी हा विषय विधानपरिषदेमध्ये लक्षवेधी लावून या विषयावर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली आणि या तलावांच्या खोलीकरण करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी विषयाची गांभीरता लक्षात घेऊन गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या मामा तलावाच्या खोलीकरणावर लक्ष देऊन या जिल्ह्यातील दोन हजारच्या वर तलावाचे खोलीकरण करण्यात यावे आणि जिल्ह्यातील एका धरणाचे सुद्धा खोलीकरण करण्यात यावे, पाण्याचा स्त्रोत वाढवावा, यासाठी मंजूरी प्रदान केली आणि त्यामुळे आमदार परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये येऊन कार्यशाळा घेऊन कशाप्रकारे हा तलावाचा गाळ काढून शेतकऱ्यांना, गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या रॉयल्टी आकारण्यात येणार नाही आणि मुक्त स्वरूपात नागरिकांना हा गाळ गावातील रस्त्यात भरण्यासाठी घरकुलाच्या भरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी गाळाचा वापर करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी आमदार परीनय फुके यांनी दिली.
त्यामुळे या जिल्ह्यातील जवळपास पहिल्या फेरीमध्ये 400 तलाव आणि एक धरण या योजनेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मामा तलावात पाण्याचे स्त्रोत वाढणार आहे आणि येणाऱ्या पुढील काळात इतर तलावांचे सुद्धा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती परिणय फुके यांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली