LOKSANDESH NEWS
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ SDPI चा कँडल मार्च
पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ जालन्यात SDPI च्या वतीनं कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
या कँडल मार्च मध्ये नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन पाकिस्तानी अतिरेक्यांचा जाहीर निषेध नोंदवत अतिरेक्यांवर कारवाईची मागणी केली.
तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सहभागी करून घ्यावे, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली