शिवसेना ठाकरे पक्षातर्फ पहलगाम घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शिवसेना ठाकरे पक्षातर्फ पहलगाम घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

LOKSANDESH  NEWS 



                     शिवसेना ठाकरे पक्षातर्फ पहलगाम घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन



  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विलास भवर व  शहरप्रमुख प्रसाद प्रजापत यांच्या नेतृत्वाखाली विश्रामगृहासमोर गणूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करुन पाकिस्तानचा ध्वज पायाखाली तुडवला व, जम्मु कश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याबाबत जाहीर निषेध करण्यासाठी चांदवड विश्रामगृह येथे शिवसैनिक उपस्थित होते.

  मंगळवार दि. २२/४/२०२५ रोजी झालेल्या जम्मू कश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो अंदाधुंद गोळीबार केला जो भ्याड हल्ला केला त्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला व अनेक पर्यटक हे गंभीर जखमी झालेले आहे या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा चांदवड तालुका व  शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक जाहीर निषेध करण्यात आला.  



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली