दुकानामध्ये महापुरुषांचे फोटो असलेले टाईल्स लावणाऱ्या एका व्यापाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात, सर्वांना शांतता राखण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे आवाहन
गोंदिया शहरातील एका सिमेंट व्यापाऱ्याने आपल्या दुकानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेली टाइल्स खाली लावलेली होती. त्यामुळे काही तरुणांनी त्या व्यापाऱ्याला महापुरुषाचा अपमान केल्याचा आरोप करत बेदम मारहाण केली व गोंदिया पोलीस स्टेशन येथे आणले.
पोलिसांनी सदर व्यापाऱ्याला ताब्यात घेतले असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले आहे. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त गोंदिया शहर पोलीस स्थानक व लगतच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली