स्वच्छतेच्या नावाखाली बोगस बिल काढून कोट्यवधी रुपयांची लुट - काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार
स्वच्छतेत नापास झालेल्या महानगरपालिका आयुक्तांची बदली करा, अन्यथा जनआंदोलन उभारू, असा निर्वाणीचा ईशारा जालना जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा नंदा पवार यांनी दिला आहे.
शहरात घंटा गाड्या असूनही स्वच्छता होत नाही. सर्वत्र घाण साचली आहे. स्वच्छतेच्या नावाखाली बोगस बिल काढून कोट्यवधी रुपयांची लुट सुरू असल्याच पवार यांनी म्हटलं आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी शहराचा कचरा करून टाकला. स्वच्छतेच्या शहरांमध्ये जालना शहराचं नाव राहिलेलं नाही. त्यामुळे शहराचा कचरा करणाऱ्या आयुक्तांच्या तोंडावर शहरातील कचरा नेऊन फेकला पाहिजे, असंही पवार म्हणाल्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली