मुंबईतील नरिमन पॉइंट येथे झील ऑर्ट प्रदर्शन, चित्र प्रदर्शनी पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील बजाज आर्ट गॅलरी येथे "THE ZEAL" नावाचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ही संपूर्ण चित्र एकाचं कलाकाराकडून काढण्यात आली आहेत. त्यांचं नाव आहे चित्रकार दीपा कुलकर्णी. या प्रदर्शनात पेटिंग आणि क्ले आर्टशी संबंधित सर्व गोष्टी असून, एक नविन प्रयोगाच्या माध्यामातून दिपा यांनी चित्र रेखाटली आहेत. चिनी मातीचा चित्रकलेसाठी वापर करून दीपा कुलकर्णी यांनी आकर्षक अशा विविध रंगांनी रेखाटलेल्या पेंटिंग या प्रदर्शनात पाहायला मिळतात.
दीपा कुलकर्णी यांनी लॉकडाऊनच्या काळात ही आकर्षक चित्र काढायला सुरुवात केली. जयपूर, बंगलोर, न्यू यॉर्क अशा वेगवेगळ्या ठिकणी दिपा यांनी चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. सध्या बजाज आर्ट गॅलरी येथील त्यांचे हे दुसरे सोलो एग्जीबिशन आहे. या प्रदर्शनाला कालाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रत्येक चित्र काहीतरी संदेश देत असतं, अर्थपूर्ण चित्र काढण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, असे चित्रकार दीपा कुलकर्णी यांनी सांगितले.