देऊळगाव घुबे गावात पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी काढला ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

देऊळगाव घुबे गावात पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी काढला ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

LOKSADESH  NEWS 

देऊळगाव घुबे गावात पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी काढला ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

 देऊळगाव घुबे गावात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.भर उन्हात 1 ते 2 किलोमिटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायत ने पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

 एक महिन्यापासून नळ आले नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. आम्ही करपट्टी, नळपट्टी भरतो मग आम्हाला पाणी का नाही असं सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केलाय.

 ग्रामपंचायतीच्या या नियोजनशून्य कारभारामुळेच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारभाराला वैतागून आज संतप्त महिलांनी ग्रामपंचायत वर हंडा मोर्चा काढला. पाणी समस्या मिटवली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असे महिलांनी सांगितले आहे.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.