शेगाव तालुक्यातील नखं गळती प्रकरण, पुणे येथील आरोग्य टीम बोंडगावात दाखल
शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव सह परिसरातील गावात सुरुवातीला केस गळती आणि आता नागरिकांच्या नख गळतीने शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबविता आलेले नाही. दरम्यान आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईन डायरेक्टर डॉ बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली. यावेळी नखं गळती झालेल्या बाधित रुग्णांची त्यांनी चर्चा केली.
महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्यांपूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाश झोतात आले होते. दरम्यान दिल्ली येथील आयसीएमआर च्या पथकाने हे या गावात पोहोचून केस, नखं अन्नधान्य, पाणी रक्तांचे नमुने घेऊन गेले होते. मात्र त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आचार्य व्यक्त होत असतानाच आता नख गळतीचे रुग्णसमोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
नख गळती बाबत तपासण्या सुरू करण्यात आलेले आहेत उद्याही गावांमध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहेत. गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पुणे येथील आरोग्य विभागाच्या जॉइंट डायरेक्टर डॉ. बबीता कमलापूरकर यांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.