मुंबईत विविध ठिकाणी लागलेल्या आगीत अनेकांचे जीव जातात, तर वित्त हानी ही मोठ्या प्रमाणात होत असते. आगीच्या घटनास्थळी सर्वात आधी स्थानिक पोलीस पोहोचतात. त्यामुळे या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यास हानी टळू शकते. या उद्देशाने आज मुलुंड पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या उपस्थितीत मुंबई पोलिसांना भारती फायर इंजिनियर्स मार्फत ट्रेनिंग देण्यात आले. वेगवेगळ्या गोष्टींना लागलेल्या आग कशा प्रकारे विझवता येईल याची माहिती देण्यात आली.
अग्निशमन यंत्रे कशी वापरावीत? याची प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. पोलिसांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा सराव ही करून घेण्यात आला. तसेच मुलुंड पोलिसांच्या वाहनांमध्ये, पोलीस ठाण्यात अग्निशमन सिलेंडर या कंपनीच्या वतीने देण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे आपत्कालीन आगीच्या स्थितीत मोठा फायदा होईल, अशी भावना पोलीस आणि प्रशिक्षक यांनी व्यक्त केली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली